गेवराई दि. २० (प्रतिनिधी) जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सभासदांनी टकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी नव्या जोमाने आणि तयारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत साखरेच्या उत्पादना बरोबर इथेनॉल सारख्या उपपदार्थाचे उत्पादन करुन उसाला विक्रमी भाव देण्याची ग्वाही चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. मंगळवार दिनांक २० जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चेअरमन आणि व्हॉईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. या बैठकीत संचालक मंडळांनी सर्वानुमते चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचीत संचालक, व्हॉईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर व चेअरमन अमरसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला. अमरसिंह पंडित यांनी भाषणात कारखान्याच्या प्रगतीचा आलेख मांडला, नेहमी आव्हानांना सामोरे जात कारखान्याने प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला संचालक सर्वश्री नारायणराव नवले, गणपतराव नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकरराव तौर, जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, संभाजी पवळ,कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, विजयकुमार घाडगे, नंदकिशोर गोर्डे, रहेमतुल्ला पठाण, बाबुराव काकडे, भिमा मोरे, सौ. संध्या आसाराम मराठे, सौ. शंकुतला संदिपान दातखिळ, जगन्नाथ काळे, रावसाहेब देशमुख यांच्यासह सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कदम मॅडम, रामचंद्र ठोसर आदी उपस्थित होते.
निवडीनंतर संचालक मंडळाने चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा.चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांचा सत्कार केला. यावेळी सर्व संचालक मंडळासह, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
कारखाना कर्मचारी झाला व्हॉईस चेअरमन
जय भवानी सहकारी साखर कारखान्यावर क्लर्क म्हणून नोकरीस लागल्या भाऊसाहेब नाटकर यांची आज व्हॉईस चेअरमन पदी निवड झाली, यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. आभार व्यक्त करतांना त्यांनी हा प्रवास उलगडून सांगत शिवाजीराव पंडित कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.















