बुलडाणाः जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत निवडणुक निकाल समोर आले असून भाजपचे माजी मंत्री आमदार संजय कुटे यांना धोबीपछाड देत संग्रामपूर येथे बच्चू कडू यांच्या जनशक्तीला मतदारांनी पसंती दिली आहे. पहिल्यांदाच संग्रामपूर नगरपंचायत मध्ये प्रहारने १२ ठिकाणी विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे बुलडाण्यात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला घवघवीत यश मिळाले आहे, तर मोताळा नगर पंचायतच्या निवडनुकीत १२ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर, सेना ४, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी झाले आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये कॉग्रेसने १२ ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपाला खाते सुद्धा उघडता आले नाही.मोताळ्यात १८ जानेवारीला चार जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये चार जागेकरिता १५ उमेदवार होते. आता एकूण १७ जागेसाठी ६४ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. तर संग्रामपूर पंचायतीच्या चार जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे. याअगोदर २१ डिसेंबरला १३ वार्डाची निवडणूक पार पडली होती. आज बुधवारी १७ जागांचा निकाल जाहीर झाला आहे.आज १९ जानेवारीला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी एकूण आठ टेबल होते. प्रत्येक टेबलवर दोन कर्मचार्यांनी तीन फेऱ्या मतमोजणी पार पाडली. पहिल्या फेरीत एक ते आठ प्रभाग, दुसऱ्या फेरीत नऊ ते १६ प्रभाग व तिसन्या फेरीत प्रभाग १७ ची मतमोजणी पार पडली.