बीड : गणेश चतुर्थी निमित्त राशी निवासस्थानी व संघर्ष योध्दा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व लिंबागणेश जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्रीताई मस्के, यांच्या हस्ते गणरायाचे पुजन करण्यात आले. तर जगावरील आलेले कोरोनाचे हे संकट विघ्नहर्ता दुर कर अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.यावेळी जि परिषद सदस्य श्री रामदास बडे, डॉ लक्ष्मण जाधव, बद्रीनाथ जटाळ, अजय ढाकणे, पंकज धांडे,बंडू मस्के, अनिल शेळके, दिलीप डोंगर, अविनाश नवले, भागवत खाकरे, व आदी उपस्थित होते.