बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : भाजपचे शिरूर कासारचे तालुकाध्यक्ष डॉ. मधूसुदन खेडकर यांच्या मागणीला यश आले आहे. त्यांच्या मागणीनुसार पाटोदा ते शिरूर-सावरगाव-तिंतरवणी-शिंगारवाडी तरगव्हाण मार्गे चकलांबा ही मुक्कामी बस गणेशविसर्जनानंतर सुरू होणार आहे. या बसमुळे लाखो लोकांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागणार असून याबद्दल एसटी महामंडळासह डॉ. खेडकर यांचे आभार मानले जात आहेत.
पाटोदा ते शिरूर -सावरगाव -तिंतरवणी-शिंगार वाडी तरडगव्हन मार्गे चकलांबा मुक्कामी गाडी चालू करण्यासंबंधी एसटी विभागीय वाहतूक अधिकारी श्री पडवळ यांच्याकडे भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष डॉ. मधुसुदन खेडकर यांनी मागणी केली होती. त्यांची ही मागणी योग्य असुन ही बस गणपती विसर्जनानंतर आम्ही निश्चित चालू करू, असे आश्वासन त्यांना दिले आहे. त्यामुळेच संबंधित कर्मचार्यांचे व पाटोदा डेपो मॅनेजर भुसारे यांचे आभार मानले जात आहेत.