बीड

बीडकरांना विकासाची दिशा दाखवणारे संघर्षशील नेतृत्व आ.संदिप भैय्या क्षीरसागर!


बीड विधानसभा क्षेत्र हे जिल्ह्याचं केंद्रस्थान आहे. बीडची मागासलेपणाची ओळख पुसण्यासाठी आणि बीड मतदार संघाचा विकास करण्यासाठी आ.संदिप भैय्या अहोरात्र मेहनत घेत आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कार्यकाळात बीड विधानसभा क्षेत्राचा जो विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी स्व.काकू-नानांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा घेवून संघर्षाची वाटचाल करत रोज डोंगराएवढ्या संकटांचा सामना करत आ.संदिप भैय्यांची सामाजिक, राजकीय वाटचाल सुरू आहे. स्व.काकूंनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. पुरोगामी विचार घेवून जनसेवा करत स्व.काकूंनी असंख्य लोकांच्या मनावर राज्य केलं. स्व.काकूंचा समाजसेवेचा वसा आणि वारसा घेवून खर्‍या अर्थाने आज संदिप भैय्या लोकांच्या सेवेत आहेत, या संघर्षशिल नेतृत्वाचा आज वाढदिवस.
कोव्हिड काळात अहोरात्र सेवेत, रूग्णांना दिला आधार
साधारत: दोन वर्षापूर्वी कोव्हिड-19 या साथरोगाने अख्ख्या जगाला संकटात टाकलं. बीडलाही कोरोनाने थैमान  घातल्यानंतर आ.संदिप भैय्या स्वत: आपल्या सहकार्यांना सोबत घेत अहोरात्र रुग्णांची सेवा करतांना दिसले. बीडच्या जिल्हा रूग्णालयात, खासगी कोव्हिड रूग्णालयामध्ये काय कमी, काय जास्त, ऑक्सिजनची कमतरता या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून रूग्णांना आधार दिला. कुटुंब आजारी असतांना देखिल आ.संदिप भैय्या रूग्णांच्या निरंतर सेवेत होते. याच कोव्हिड काळात हाताला काम नसल्याने हातावरपोट असणार्‍या श्रमिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला. त्यावेळी अनेक गोरगरीबांच्या घरी अन्नधान्याची सोय केली.
पवार साहेब म्हणजे उर्जा, पक्षाशी एकनिष्ठता!
आ.संदिप भैय्यांची राष्ट्रवादी काँगे्रस पक्षावर अफाट एकनिष्ठता आहे. पवार साहेब म्हणजे उर्जा असं म्हणत आ.संदिप भैय्यांनी अनेक संकटांना तोंड देत आजवरचा खडतर संघर्ष केला आहे. आ.संदिप भैय्या जिल्हा परिषदेचे सदस्य असतांना जि.प.अध्यक्ष निवडणूकीत अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी आ.संदिप भैय्यांची उमेदवारी डावलल्या गेली. त्यावेळी संयम, शांतता, दुरदृष्टी दाखवत पक्षाचा आदेश सर्वोच्च मानत पक्षाने दिलेल्या जि.प.अध्यक्ष दिलेल्या उमेदवारास मतदान दिले. पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांमध्ये काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून आ.संदिप भैय्यांना मोठे यश आले. अनेकांनी पदाचे अमिषे दिली, परंतू या अमिषाला बळी न पडता आ.संदिप भैय्यांनी आपली सर्व ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी उभी केली यातून आ.संदिप भैय्यांची पक्ष एकनिष्ठता दिसून येते.
गाव,वाडी,वस्ती,तांड्यावर विकास कामे
गाव,वाडी,वस्ती, तांड्यावर गेल्या तीस वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे आ.संदिप भैय्यांनी कोव्हिड काळात निधीची कमतरता असतांनाही बीड विधानसभा क्षेत्रात खेचून आणली. प्रत्येक गावात रस्ता, नाली, पाणी, वीज यासह मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आ.संदिप भैय्यांनी निधक्ष दिला. कामे दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी आग्रहाची भूमिका घेत वाडी, वस्ती, तांड्यावरील विकास कामे दर्जेदार करून घेतली आणि आता बीडच्या विकासाची दिशा संघर्षशील वाटचालीत आ.संदिप भैय्या करत आहेत.
बीड शहरासाठी मोठ्या प्रमाणात आणला निधी खेचून
बीड शहरात फिरल्यानंतर कोणत्याच रस्त्यावरून नीट चालता येत नाही. याच बीड शहराचा विकास करण्यासाठी शहरातील नागरीकांनी मुलभूत सुविधा करण्यासाठी आ.संदिप भैय्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. अर्थसंकल्पीय निधीतून अंबिका चौक ते खापरपांगरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. 6 कोटी रूपयांचे हे काम लवकरच सुरू होईल. खापरपांगरी ते साक्षाळपिंप्री हा रस्ताही सीआरएफमधून मंजुर करून घेतला. अंकुश नगरकडे जाणार्‍या पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील पुलासाठीही 3 कोटी रूपये मंजूर करून घेतले आणि लवकरच ही कामे सुरू होत आहेत. बिंदूसरेच्या पुलावर खासबाग येथे मोमीनपुर्‍याला जोडणारा बंधारा कम पुलाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी आ.संदिप भैय्या सातत्याने प्रयत्नशिल आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. मोंढा भागात भुयारी नाल्या व शहरातील विविध भागात रस्ता, नाल्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणला. शहरातील आयटीआय येथे नवीन इमारत, शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम, अल्पसंख्यांक मुलीचे वसतीगृह, मोमीनपुर्‍यात शादीखाना आदी कामे आता प्रत्यक्षात सुरू होतील. आ.संदिप भैय्या बीड शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणत असून आता लवकरच ही विकास कामे सुरू होत आहेत.
पवार साहेब,गडकरी साहेबांच्या माध्यमातून
बीड शहरातील बायपास अंतर्गत रस्त्याचा प्रश्न मार्गी
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा करून बीड शहरातून जाणारा कोल्हारवाडी-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जालना रोड-जिरेवाडी हा बायपास टू बायपास रस्ता खा.शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून मार्गी लावून घेतला. यासाठी आ.संदिप भैय्यांच्या अनेक वेळा दिल्लीवारी झाली. या दिल्लीवार्‍यांचं फलित म्हणून लवकरच बीडकरांच्या जिव्हाळ्याचा बीड शहरातील हा महत्त्वाचा रस्ता मार्गी लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला असून प्रत्यक्षात लवकरच ते काम आता सुरू होत आहे.
ग्रामीण भागाच्या जलसिंचन साठी प्रयत्नशील
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बंधारे, तलाव या कामांच्या माध्यमातून जलसिंचनासाचे भरीव काम होत आहे. ग्रामीण भागातील मोठ्या नदी, नाल्यांवर बंधारे बांधून शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून देत आ.संदिप भैय्या खर्‍या अर्थाने जलसिंचनासाठी प्रयत्नशिल आहेत. त्याचबरोबर खांडेपारगाव टुकुर प्रकल्प क्षेत्रात बंधारे बांधून शेतकर्‍यांना पाणी उपलब्धता मिळावी तसेच शिवणी, जरूड सिंचन प्रकल्पातील सांडव्यावरून वाहणारे पाणी वापरण्यात यावे, शिरूर तालुक्यातील डिसल्याचीवाडीचा तलाव लवकरच साकारला जावा, त्याचे काम सुरू व्हावे यासाठी आ.संदिप भैय्या सातत्यान शासन दरबारी प्रयत्न करत असतांना दिसून येत आहे.
शहरात आणली नवीन विकास कामे
शहरात नवनवीन विकास कामे आणत आ.संदिप भैय्यांनी बीड शहरामध्ये शंभरपेक्षा अधिक नवीन अंगणवाड्यांना मंजूरी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी केल्यानंतर शासनस्तरावरून यावरती तातडीने कारवाई सुरू झाली. एमआयडीसी भागात पोलीस चौकी उभारण्याबाबत गृहमंत्री वळसेपाटील यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्याचीही कार्यवाही सुरू झाली. अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहालाही खर्‍या अर्थाने गती मिळाली असून यासह विविध विकास कामे आता शहरात दिसून येतील.
नगर पालिकेवर विसंबुन न राहता स्वत: यंत्रणा उभारली
नगर पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने आ.संदिप भैय्यांनी स्वत:ची यंत्रणा उभारत स्वच्छता, कोव्हिडबाबत सॅनिटायझर फवारणी, साथरोग पसरवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत स्वतंत्र यंत्रणा उभा केली. 50 मजुरांचा ताफा, अत्याधुनिक सॅनिटायझर फवारणी यंत्र घेवून आ.संदिप भैय्या शहराच्या विविध भागात फिरले. खर्‍या अर्थाने जे काम नगर पालिका प्रशासनाने करायला पाहिजे होते ती कामे नगर पालिका करण्यास कमी पडत असल्याने आ.संदिप भैय्यांनी स्वत: यंत्रणा उभा करून ती करून घेतली. 
——–माणिक खांडे,
स्वीय सहाय्यक, आमदार संदिप भैय्या क्षीरसागर,बीड

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!