लोकाशा, दि.24( लोकाशा न्युज):- येथील सुप्रसिद्ध व्यापारी रमण राजमलजी लोढा(वय55) यांचे मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजता औरंगाबाद येथील ओरियन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान निधन झाले. सतीश लोढा यांचे ते काका होते.

प्रत्येक माणसास मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे. रमण लोढा यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच आपल्या मुलाला बोलावत सर्व व्यापराबद्दल चर्चा करून सर्वांसोबत गुण्यागोविंदाने आणि मिळून मिसळून राहण्याचे सांगितले. नियतीने आणि शरीराने दगा दिला. आजाराशी संघर्ष चालू असताना मंगळवारी दि.24 ऑगस्ट 2021 रोजी रात्री औरंगाबाद येथील रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात भाऊ रतीलाल लोढा, श्रीनिवास लोढा, सुरेश लोढा, रशिक लोढा, सुदर्शन लोढा, पत्नी, मुलगा करन लोढा असा मोठा परिवार असुन त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वांसोबत घेऊन चालणाऱ्या वृत्तीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. लोढा कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या दुःखात लोकाशा परिवार सहभागी आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.















