लोकाशा न्यूज
मानवी जीवनातले अंतिम सत्य मृत्यू असला तरी जेव्हा ते अकाली येते तेव्हा ते अमान्य आणि दुखद ठरते . रमण शेठ लोढा यांचा मृत्यू देखील मनाला चटका लावणारा आहे .
बीड शहरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व तथा उद्योजक रमण शेठ लोढा यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने औरंगाबाद येथे दाखल केले होते . बीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र परिचीत असणारे व प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा.रमण लोढा यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान आकस्मित निधन झाले. कायम उत्साही राहणाऱ्या या व्यक्तीमत्वाची भविष्यात वेळोवेळी आठवण येत राहिल. त्यांच्या अकाली निधनामुळे लोढा परिवारावर कोसळलेल्या या दु:खामध्ये लोकाशा परिवार सहभागी आहे, ईश्वर त्यांना या दु:खातुन सावरण्याचे बळ व सामर्थ्य प्रदान करो.त्यांच्यावर दुपारी १.०० वाजता अमरधाम, मोंढा रोड, बीड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतील . लोढा कुटूंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.