बीड

सीईओ अजित पवार शुक्रवारी घेणार पदभार


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : मागच्या दोन दिवसांपुर्वी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांची मुंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी अजित पवार हे आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत. ते अत्यंत हुशार
 आणि कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कर्तव्य दक्षपणातूनच सातत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेले आहे. त्यामुळे त्यांचे निर्णय आणि त्यांचे काम नक्कीच बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!