बीड

एलसीबीच्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सतिष वाघ यांच्याकडे, गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी भारत राऊत यांना दिला निरोप


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांची एसीबीमध्ये बदली झाली आहे. आता त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार मंगळवारी वाघ यांनी आपल्याकडील अतिरिक्त पदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी एलसीबीचे तात्कालीन पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना निरोप देण्यात आला आहे. भारत राऊत हे अत्यंत चाणक्य दक्ष अधिकारी आहेत, पोलिस अधीक्षकांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी नेहमीच चांगल्या पध्दतीने पेललेली आहे, विशेष म्हणजे मोठं मोठ्या प्रकरणातील तपास लावून जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे बीड जिल्हा त्यांना आणि त्यांच्या कार्याला कधीच विसरू शकत नाही. राऊत यांची बदली एसीबीत झाल्यानंतर काल स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी एकत्र येवून त्यांना निरोप दिला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक सतिष वाघ, एपीआय आघाव, एपीआय झोटे, पीएसआय जोंधळे, दुल्लत, पोलिस कर्मचारी बालाजी दराडे, संजय जायभाये, मोहन क्षीरसागर, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, कोल्हे, नारायण कोरडे, शेख नसीर, करांडे, नारायण जाधव, प्रसाद कदम, आलीम शेख, संगिता सिरसाट, कौशल्या ढाकणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!