सिरसाळा, दि. 5 (लोकाशा न्यूज) : सिरसाळ्यासह परिसरातील डिग्रस-पोहनेर रोडवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सिरसाळ्यात पाच दुकाने फोडली तर डिग्रस-पोहनेर रोडवर पशुधन डॉक्टरास चाकूचा वार करुन लुटले असल्याची घटना घडली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 3 ऑगस्ट रोजीच्या रात्री 9 वाजता च्या दरम्यान पशुधन डॉक्टर बाळकृष्ण कारभारी रा.डाकू पिंप्री ता.पाथरी जिल्हा परभणी, हे शेळीच्या उपचारासाठी डिग्रस येथे आले होते .उपचार करुन वापस निघाले असता पोहनेर रोडवरील कोथरुळ चारी जवळ दुचाकीवरुन दोघांनी येऊन चाकूचा धाक दाखवून खरात यांचा मोबाईल, सोनं, रोक रक्कम घेऊन पुन्हा चाकूचा वार करुन गंभीर जखमी केले यात डॉ. खरात यांच्या उजव्या हाताच्या दंडास जखम झाली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे कलम 394 नुसार खरात यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल असुन अधिक तपास पिएसआय विघ्ने करत आहेत. तर सिरसाळ्यात दिनांक 4 रोजी च्या मध्यरात्री जुने बस स्टँड रोडवरील धनश्री ज्वलर्स फोडण्याच्या प्रयत्ना सह शहाने यांचे भांड्याचे दुकान, माने यांचे साडी सेंटर, कन्फेशनरी दुकान, कृषी दुकान, कपड्याचे दुकान आदी पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत.यात तीन चोरटे असल्याचे सिसिटिव्ही मध्ये दिसुन आले आहे.पाच पैकी काही दुकानातून नगद रोकड चोरी झाल्याचे समजते आहे. बीडच्या एलसिबी टीमने घटना स्थळी भेट दिली आहे. रात्री उशीरा पर्यंत सिरसाळ्यातील ह्या पाच दुकान फोडी प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. सिरसाळा पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन पाहणी केली आहे.
खाकी बी अलर्ट
सिरसाळा व परिसरात दोन दिवसांत चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुढेही जबरी चोरी, दुकान फोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण चोरट्यांच्या रडारवर सिरसाळा असल्याचे ह्या दोन घटने वरुन लक्षात येते आहे. म्हणून पोलिस प्रशासनाने ’ बी अलर्ट ’राहणे गरजेचे आहे.