बीड दि.26 – शहरातील खाजगी रुग्णालयात शिकाऊ नर्स म्हणून काम करणार्या 26 वर्षीय तरूणनीे पाली जवळ गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमावार दि.26 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे.
सोनाली अंकुश जाधव (वय-26 रा.शिवाजी नगर,बीड) असे त्या तरुणीचे नाव असून ती दीप हॉस्पिटलमध्ये शिकाऊ नर्स म्हणून काम करत होती. सोमवारी दुपारी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पालीजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी स्कुटी (एम.एच.20ई.बी.2504) आढळून आली असून नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या तरुणीने गळफास का घेतला याची माहिती अद्याप समोर आली नाही.