महाराष्ट्र

मुंडे समर्थकांच्या नाराजीची लाट बीड, नगरबरोबरच आता पुण्यात धडकली, उपाध्यपदाचा दिला राजीनामा

पिंपरी चिंचवड, 11 जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) नुकताच पार पडला. पण, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. बीडमध्ये (beed) 50 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे (munde supporters resign) दिले आहे. या नाराजी नाट्याची लाट बीड, नगर नंतर आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसेठ रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

बीडसह संपूर्ण राज्यात भाजपमध्ये राजीनामा (resignation) सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत एकूण 50 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या 6 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!