बीड

मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही , तर व्रत म्हणून आले, आम्ही नाराज नाही, होणाऱ्या चर्चांना आता विराम द्यावा ” – पंकजाताई


मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. त्यामध्ये भागवत कराड यांनी केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यावरून मुंडे भगिणींवर अन्याय झाला, असा सूर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे . मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांची वर्णी लागेल , अशी चर्चा रंगली होती . त्या दिल्लीलाही गेल्याच्या बातम्याही येत होत्या . त्यावर ” आम्ही नाराज नाही . होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा ” , असं स्पष्टीकरणं भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिलं आहे . पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली . यावेळी त्या भावूक झालेल्या दिसल्या . ” नियुक्त झालेल्या मंत्र्यांना शुभेच्छा देते . मी नाराज असण्याचं कारण नाही . मी अभिनंदनांची ट्विट करावसं वाटलं नाही . मुंडे साहेबांमुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे , त्यामुळे आम्हाला मंत्री पद मिळावं , अशी लोकांची अपेक्षा असतात . लोकांशी असलेलं नातं कधीच तुटत नाही . पक्षश्रेष्ठींनी नव्या लोकांना संधी दिली , त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही . त्यामुळे होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा ” , असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिलं .

” मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही , तर व्रत म्हणून आले आहे . भाजपला मला संपवायचं आहे , असं मला वाटत नाही . वंजारी समाजातील कोणताही नेता असला मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे . प्रीतमताई मुंडे यांना पद मिळालं नाही म्हणून नाराज नाही . मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे . भाजपला टीम नरेंद्र आणि टीम देवेंद्र मान्य नाही ” , असं मत पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केलं आहे . ” आम्ही केलेले कष्ट हे पक्षासाठीच केलेले आहेत . मी खूप भाग्यवान आहे मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले . महाराष्ट्राचा नेता असतो . तो कोणत्या जातीचा नेता नसतो . त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलण योग्य नाही . आम्ही दोघींना कधीही मंत्री पदाची मागणी केलेली नाही . त्यामुळे नव्याने मंत्रीपद मिळणाऱ्या नेत्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत ” , अस मत पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!