बीड

दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला विसर! दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी त्वरित करा – आ. नमिता मुंदडा, रेग्युलर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानांही प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान तात्काळ देण्याची केली मुख्यमंत्रांकडे मागणी

दोन लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला विसर!
दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी त्वरित करा – आ. नमिता मुंदडा, रेग्युलर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानांही प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान तात्काळ देण्याची केली मुख्यमंत्रांकडे मागणी
बीड, दि. 31 : जिल्ह्यातील दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या कर्जदारांना अद्यापही कर्ज माफी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळत नाही . दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यानांही कर्ज माफी दिली जाईल असे शासनाने जाहीर केले होते . तसेच रेग्युलर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यानां प्रोत्साहनपर अनुदान ५०,००० / – ( पन्नास हजार ) रुपये देण्याबाबत शासनाने घोषणा केली होती . परंतु त्याची अमलबजावणी अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही . तरी दोन लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी त्वरित करावी व वेळेवर पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्याबाबत निर्णय घ्यावा , अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!