बीड (प्रतिनिधी):- शहरातील कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 दिवसापासून स्वच्छता, निर्जुंतीकीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी मोठी टिम कार्यरत आहे. भक्ती कन्स्ट्रक्शन, एकनाथ नगर परिसरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरण या मोहिमेची पाहणी करून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पाहणी करून योग्य त्या प्रशासनाला केल्या आहेत.
बीड शहरातील अनेक ठिकाणचे नाले तुंबलेले आहेत. त्यात वाढते कोरोना रूग्ण व त्याचा संसर्ग थांबावा यासाठी दोन अत्याधुनिक सॅनिटायझर फवारणी यंत्रे जे की इमारतीच्या दोन मजल्यापर्यंत सॅनिटायझर फवारणी करत आहे. यासह इतर फौजफाटा स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याच्या कामासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आरोग्याच्या ही सर्व यंत्रणा काम करत असून वार्डातील नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरीक या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवत मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या भागातील पाहणी केल्यानंतर या स्वच्छते निर्जंतुकीकरण मोहिमेत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी होवून आपल्या भागातील स्वच्छता व कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक रमेश चव्हाण, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, अजय सुरवसे यांच्यासह आदी जण उपस्थित होते.