बीड

रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्या, शेतकर्‍यांचा प्रश्‍न खा. प्रीतमताईंनी पंतप्रधानांसह केंद्रीय रासायनिक मंत्र्यांच्या कानावर घातला



बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : रासायनिक तथा मिश्र खतांमध्ये झालेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी एका पत्राव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय रासायनिक व उर्वरक राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या एका पत्राने बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामापुर्वीच खत कंपन्यांनी खतांचे प्रचंड प्रमाणात दरवाढ केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बुर्दंड सोसावा लागणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच संपूर्ण शेतकरी अडचणीत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी खत कंपन्यांनी खतांचे भाव वाढविले आहेत. कोरोनाच्या संकटात शेतकर्‍यांना मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. खरीप हंगामही तोंडावर आला आहे. या हंगामापुर्वीच रासायनिक तथा मिश्र खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्या, अशी मागणी खा. प्रीतमताईंनी एका पत्राव्दारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय रासायनिक व उर्वरक राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या एका पत्राने बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!