बीड

मराठा आरक्षणासाठी मविआचे राष्ट्रपतींना निवेदना पेक्षा पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेणार ही जमेची बाजु – – भाऊसाहेब डावकर


मराठा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द म्हणून दिला आहे.त्यानंतर मराठा समाजबांधवांच्या भावना अतिशय तिव्र स्वरुपाच्या आहेत.करोनाचे संकट असल्याकारणानं त्या दिसत नसल्या तरी त्या पुरलेल्या विस्त्वा प्रमाणेच आहेत.पण काल महाविकास आघाडी सरकारने जी तत्परता दाखवली व राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना रितसर निवेदन दिले.हे आमच्यासारख्या चळवळीमधील कार्यकर्त्यांना फार काही भावलेलं नाही.पण असेच शिष्टमंडळ पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठा आरक्षणाची बाजु मांडु असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष सांगितले हि कोटेतरी आरक्षणाकरता जमेची बाजु वाटतेय असं मत भाऊसाहेब डावकर यांनी व्यक्त केलं आहे.
पुढे ते म्हणाले की,मराठा आरक्षणामध्ये सर्वच पक्ष,नेते आपण आपली कातडी बचाव भुमिका घेत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.राजकारणाच्या कचाट्यात आरक्षण अडकले की काय असे वाटणे वावगे ठरु नये.मराठा समाजाचा सर्वच राजकीय पक्षाकडुन भ्रमनिरास झालेला असताना काल अचानकपणे मविआ सरकारचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले आणि त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना रितसर निवेदन दिले हे आम्हाला एवढं काही रुजलं नाही.पण पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले कि,असेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाकरता पंतप्रधानांची भेट घेणार आहोत.हि बाब कोठेतरी जमेची वाटली.सरकारच्या वतीने आरक्षण रद्द झाल्यानंतर आरक्षणाकरता पहिलं पाऊल उचलले आहे.सुरुवात झाली आहे.हि आमच्यासाठी जमेची बाजु आहे.अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब डावकर यांनी व्यक्त केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!