बीड,दि.8(लोकाशा न्युज)ः जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दि.8 मे ते 12 मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवलेला आहे. या कालावधीत वैद्यकिय सेवा सोडता इतर सर्वच अत्यावश्यक सुविधात मोडणार्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. या आदेशात शनिवारी जिल्हाधिकारी यांनी सुधारणा केली असून आता मंगळवार व बुधवार (दि.11 व 12 मे) रोजी जिल्ह्यातील सर्वच अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफुट दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी आदी स.7 ते 10 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.