बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी (दि.16) सांयकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले असून घटनेची अधिक माहिती घेत आहेत.
बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. शुक्रवारी पोहण्यासाठी खादाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेहाचा शोध सुरु आहे. घटनास्थळी बीड ग्रामीणचे पोनि.संतोष साबळे, सपोनि.योगेश उबाळे, फौजदार पवनकुमार राजपुत, रोटे, पोह.आनंद मस्के, राऊत, सानप, दुबाले, जायभाये, तांदळे आदींनी धाव घेतली आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली असून एकच आक्रोश केला आहे. तिघेही तरुण हे 17 ते 20 वयोगटातील आहेत. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.