बीड

अंत्योदय ‘ हेच ध्येय बाळगून निर्भिडपणे काम करा,भाजपा स्थापना दिनानिमित्त पंकजाताई, खा. प्रितमताई मुंडे यांचा कार्यकर्त्यांशी व्हर्चुअल संवाद

मुंबई । दिनांक ०६।
भारतीय जनता पक्ष हा संस्कारावर आधारलेला पक्ष आहे. राष्ट्र प्रथम आणि ‘सेवा ही संघठन’ हिच भाजपची खरी ओळख आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवून देणा-या विभूतींनी आपल्याला अंत्योदया चा मूलमंत्र दिला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘अंत्योदय’ हेच ध्येय बाळगून निर्भिडपणे काम करावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांशी व्हर्चुअल संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. संवादापूर्वी त्यांनी वरळी येथील कार्यालयात भाजपचा ध्वज फडकावला तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्थापना दिन साजरा केला. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी यावेळी त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

भाजपा आज आपला ४१ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. पक्ष विस्तारासाठी आतापर्यंत अनेक नेत्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले, प्रसंगी बलिदानही दिले. महाराष्ट्रात प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांनी हा पक्ष वाडी, वस्ती, तांडा व तळागाळातील लोकांपर्यंत नेला. पिता व नेता म्हणून त्यांची आठवण मला सातत्याने येते, ते आपला स्वाभिमान आहेत. शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचा समृध्द इतिहास आपल्याला आहे. नरेंद्र मोदी यांचे समर्थ नेतृत्व आज देशाला लाभले आहे, याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे असे पंकजाताई यावेळी म्हणाल्या.

भाजपा हा संस्कारावर चालणारा पक्ष आहे.समाजात संस्कारी व्यक्तीलाच जास्त त्रास सहन करावा लागतो, असंस्कारित लोकांना नाही. चारित्र्यवान आणि संस्कारक्षम कार्यकर्त्यांची आज खरी गरज आहे आणि तशाच कार्यकर्त्यांची फौज आज माझ्याकडे आहे, मला त्यांचा अभिमान आहे असे सांगून त्या म्हणाल्या, आपले भविष्य चांगले आहे. आपल्याला तळागाळातील लोकांची सेवा करायची आहे. शेतकरी, शेतमजूर, निराधार, वंचित, उपेक्षित लोकांना न्याय देण्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी योजना आखल्या आहेत. ‘अंत्योदय’ चा नारा अधिक तीव्रतेने पुढे न्यायचा आहे.

बुथ टीम मजबूत करा

पंकजाताई मुंडे यांनी यावेळी ‘वन बुथ थर्टी युथ’ ही संकल्पना मजबुत करण्याचे आवाहन केले. कुणाच्याही दहशतीला घाबरू नका, मी तुमच्या पाठिशी आहे. निर्भीड व स्वाभिमानी बाण्याने संघटित होऊन काम करा असे आवाहन केले.

खा. प्रितमताई मुंडे
—‐——————
भाजपच्या स्थापनेला आज ४१ वर्षे झाली आहेत. पक्षाला आपण सर्व कुटुंबासारखं मानतो, त्यामुळेच तन मन धनाने आपण एकरूप होऊन जोडले गेलो आहोत, आगामी काळात पक्षाचे काम अधिक जोमाने करावे असे आवाहन करत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

या व्हर्चुअल मिटिंगमध्ये आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे, अच्युत गंगणे यांचेसह शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!