बीड आष्टी

धसांच्या दणक्याने प्रशासन सात पाऊले मागे; तीन दिवसाच्या बंदनंतर आष्टीत मिळणार शिथिलता



बीड, दि.२६ (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्या नंतर आ. सुरेश धस यांनी परखड भूमिका घेत सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली. गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नसल्याचे कळवले. यावेळी त्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा विलाज असल्याचे सांगत प्रशासन नाहक निर्णय घेतल्याचे म्हटले होते. रुग्णाची आकडेवारी दाखवत जिल्ह्यात गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. सामान्य लोकांचे दुखणे मांडणारे ते एकमेव नेते होते त्यांच्या मागणीला त्यांच्या तालुक्यात यश आले असून आ. धसांच्या दणक्याने लॉकडाऊन १० दिवसाचा काळ ३ दिवसावर आलेला असून प्रशासन तब्बल ७ पाऊल मागे सरकले आहे. २९ मार्च पासून शिथिलता टप्प्याटप्प्याने देऊ असे उपविभागीय अधिकारी पाटोदा यांनी स्वाक्षरीने पत्र दिलेले आहे. यावेळी व्यापारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. धसांच्या या लढ्याने प्रशासन कसे ताळ्यावर आणले जाते याचा मार्ग समोर आला. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!