बीड

घरातील पंख्याला गळफास घेवून 16 वर्षीय तरूणीची आत्महत्या


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन एक 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील बजरंगनगर येथे गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आली.
पौर्णिमा सतीश निर्मळ (वय 16 रा. बजरंग नगर ता.जि बीड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने बजरंग नगर येथे राहत असलेल्या घरामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलीसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!