महाराष्ट्र

वीज तोडणी तात्काळ थांबवा’, विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची घोषणा


मुंबई : वाढीव वीजबिलावरुन राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात देखील ते आक्रमक झाले. भाजप आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तुर्तास थांबवा, असे आदेश दिले आहेत. अजित पवार म्हणाले की, जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत वीजबिलावरुन भाजप आक्रमक, बॅनर घेऊन सदस्य वेलमध्ये उतरले. देवेंद्र फडणवीसम्हणाले की, वीज बिलावर चर्चा करावी. इतर सर्व विषय बाजूला ठेवावे. या विषयावर चर्चा व्हावी अशीच आमची भूमिका आहे, असं फडणवीस म्हणाले. नाना पटोले यावर बोलताना म्हणाले की, वीज बिलावरून कनेक्शन तोडणं सुरू आहे. त्याबाबत आमची भूमिकाही तशीच आहे. भाजप आक्रमक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान झाल्यावर वीजेबाबत निर्णय होईल. वीज तोडण्यात येणार नाही. वीज कनेक्शन बाबत चर्चा करण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले. यावर फडणवीस म्हणाले की, या निर्णयाबद्दल दादांचे आभार त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ज्यांचे तोडले त्यांना वीज कनेक्शन लावून द्या. ते पुन्हा जोडण्यात यावे, सर्वांना सामान्य न्याय द्यावा अशी देखील मागणी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!