बीड

बीडमधील जालना रोडवरील व्हियर हाऊसला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान, रात्री लागलेली आग अद्यापही अग्निशामक दलाला येईना अटोक्यात

बीड, दि.2: – बीड शहरापासून जवळच असलेल्या जालना रोडवरील सीसीआयच्या (पणन महासंघाच्या) व्हियर हाऊसला सोमवार दि. 1 मार्च रोजी रात्री भीषण आग लागली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे.
रात्री अचानक लागलेल्या आगीला विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे वीस ते पंचवीस गाड्यातील कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न करत आहेत. परंतु ती आग इतकी भीषण आहे, की ती नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाला अपयश येत आहे. भीषण आगीमुळे परिसरातीला नागरिक भयभीत झाले. असून जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!