बीड

शिवाजीनगर तांडा येथे गॅसच्या टाकीचा स्फोट; तीन घराला आग

माजलगाव, (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील मोगरा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील घरात गुरुवारी दुपारी  गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन तीन घराला आग लागली. या  आगीमध्ये नगदी रोकड सह अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून माजलगाव येथील अग्निशामक दलाने तात्काळ मोक्यावर पोहचुन ही आग आटोक्यात आणली. मोगरा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर तांडा तेथील अशोक रामा पवार यांच्या घरातील गँसचा दिनांक 25 गुरुवार रोजी   अचानक स्फोट झाला. घरी कोणीही नसल्यामुळे या आगीत जीवीतहानी झाली नाही. माञ अशोक पवार यांच्या घरातील कपाटातील नगदी 3 लाख 98  हजार रुपये, चार तोळे सोनं,फ्रिज लोखंडी कपाट ज्वारी बाजरीचे 20 पोते,संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.त्याच बरोबर त्यांच्या बाजुचे भाऊ प्रकाश रामा पवार व विकास रामा पवार यांच्या घरालाही आगे ने वेढा घातला होता त्यात प्रकाश रामा पवार यांच्या घरातील कपाटातील दिड लाख रुपयांची रोकड दोन-तीन तोळे सोनं व संसारोपयोगी साहित्य आणि धान्य जळून खाक झाले तर विकास पवार यांच्या दिड लाख रुपये नगदी रोकड संसार उपयोगी साहित्य व धान्याची पोती झाली अशोक पवार यांच्या घराच्या समोरील शेडमध्ये गाय बांधलेली होती सदरील गाय देखील गंभीर आगे मध्ये गंभीर भाजली. आग लागल्यामुळे गावातल्या सर्व मंडळीने धावपळ करून आग विजविण्याचा प्रयत्न केला.काही वेळातच माजलगाव येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यातआणली.ही आग आटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलाचे अनिल भिसे,कृष्णा रांजवन,सतिश क्षिरसागर,अनिल खंडागळे यांनी मोलाचे प्रयत्न केले. सदर घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!