बीड

मोक्क्यातील पाच आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : मोक्क्यातील पाच फरार आरोपींच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बीड जिल्ह्याच्या वार्षीक तपासणी दरम्यान अभिलेखाचा आढावा घेतला असता, पो.स्टे . अभिलेखावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत दाखल गुन्हयातील बरेच आरोपी सन -2012 पासून फरार असल्याने आयजींनी सदरची बाब गंभीरतेने घेवून , पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील आरोपींच्या शोधासाठी (07 ) दिवस विशेष मोहिम राबवून आरोपी अटक करुन पुढील कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी स्था , गु.शा . येथील अधिकारी व कर्मचारी यांची ( 04 ) पथके तयार करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत दाखल गुन्हयातील फरार आरोपी पकडणे बाबत आदेश देवून रवाना केली आहेत. दि. 9फेब्रुवारी पासून चालविलेल्या सदर शोध मोहिमे अंतर्गत स्था.गु.शा.चे अधिकारी व कर्मचारी यांनी आजपर्यंत बीड जिल्हयातील विविध पो.स्टेला दाखल संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्ह्यातील पिण्या उर्फ संतोष बाबू भोसले (रालोणगांव ता.माजलगांव) यास सोनपेट येथून पो.स्टे . यु.वडगांव गु.र.नं .103 / 2013 कलम 395 भा.दं.वि. सह कलम 3 मोक्का कायदामध्ये, संपत आबासाहेब गवते (रा. राजापूर ता.गेवराई) यास पुणे येथून पो.स्टे.तलवाडा गु.र.नं. 04/2013 कलम 395 भादंवि सह कलम 3 मोक्का कायदामध्ये, शेख मजहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहिम (रा.बांगरनाला यास बनसारोळा ता.केज येथून शेख बब्बर शेख युसूफ (रा.खासबाग), बीड यास पुणे येथून पो.स्टे.शिवाजीनगर गु.र.नं. 403/2019 कलम 302, 120 ( ब ) भा.दं.वि. सह कलम 3 मोक्का कायदामध्ये, दिपक गौतम पवार (रा.टाकळीअंबड ता.पैठण जि.औरंगाबाद) येथून ताब्यात घेवून पो.स्टे.गेवराई गु.र.नं. 78/2011 कलम 395 भादंविसह कलम 3 मोक्का कायदामध्ये पुढील कार्यवाहीसाटी संबंधीत पो.स्टे.ला हजर केले आहेत. हे सर्व आरोपी सन -2012 पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वरील गुन्हयातून स्वत : ची अटक चुकविण्यासाठी लपून राहात होते. स्था.गु.शा.चे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना अथक परिश्रमानंतर पुणे, औरंगाबाद, परभणी या जिल्हयातून ताब्यात घेवून संबंधीत पोलीस स्टेशनला हजर केले आहेत. वरील आरोपीपैकी दिपक गौतम पवार याचेवर जालना, औरंगाबाद व बीड जिल्हयात दरोडा, जबरीचोरी सारखे गंभीर स्वरुपाचे ( 11 ) गुन्हे दाखल असून वरील जिल्हयाचे पोलीस बरेच दिवसांपासून त्याचे मागावर होते, त्याला पकडण्यात शेवटी बीड पोलीसांना यश आले. आरोपी शेख मजहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहिम व शेख बब्बर शेख युसूफ हे सन -2019 मध्ये पोलीस स्टेशन , शिवाजीनगर हद्यीतील बालेपीर भागातील शिक्षक सय्यद साजेदअली यांचा खुन करुन आज पर्यंत फरार होते . त्यांच्याही मुसक्या आवळण्यात बीड पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्था , गु.शा.चे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!