बीड

एटीएम कार्ड क्लोनीगव्दारे पैसे काढणारी टोळी गजाआड, बीडच्या सायबर पोलिसांची मोठी कारवाई


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : एटीएम कार्ड क्लोनीगव्दारे पैसे काढणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या सायबर पोलिसांनी केली आहे.
फिर्यादी नामे भिमराव पायाळ (रा.पंचशील नगर , बीड) यांच्या एस.बी.आय. बँकेच्या खात्यातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने परस्पर 80,000 / – रू एवढी रक्कम काढून फसवणूक केली बाबत पो.स्टे . शिवाजीनगर येथे फिर्याद दिल्यावरून दि. 31/12/2020 रोजी गु.र.नं 484/2020 भा.दं.वि.सं.क. 420 सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम 66 क प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा गुन्हा हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये दाखल झाला असल्याने सदर चा गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब , बीड यांच्या आदेशान्वेय पोलीस निरीक्षक आर.एस.गायकवाड , पोलीस ठाणे सायबर , बीड . करीत आहेत . सदर गुन्हयाचा तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की , सदर फिर्यादीचे Aढच् कार्ड चे क्लोनिंग करुन दादर मुंबई येथे फिर्यादीचे बँक खाते मधुन 80,000 / – रू काढण्यात आले आहेत . गुन्हयाचा तपासा दरम्यान तांत्रीक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1. बीरु राजेन्द्र पांडे , वय 36 वर्षे रा . मायापुर जिल्हा गया , बिहार 2. सतिषकुमार नंदलाल प्रसाद , वय 35 वर्ष बडकी डेल्हा , जिल्हा गया , बिहार 3. मोहम्मद असद नसिम खाँन , वय 31 वर्षे , रा . मंजोलीगांव , जिल्हा गया , बिहार ह.मु. नाला सोपारा मुंबई व 4. मोहम्मद जावेद जब्बार खाँन , वय 23 वर्षे रा . गया मंजोलीगाव , जिल्हा गया , बिहार यांनी केला आहे असे निषन्न झाले . दि. 9/02/2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , सदर आरोपी हे शिर्डी येथे येणार आहेत , असे कळाल्यावरुन मा . पोलीस अधीक्षक साहेब , बीड व अप्पर पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टिम घेवुन शिर्डी येथे सापळा रचुन सदर आरोपींना ताब्यात घेतले . नंतर त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता , सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन गुन्हाकरण्यासाठी वापरलेले Aढच् उAठऊ उङजछखछॠ ऊएतखउए , लॅपटॉप , विविध बँकेचे 74 Aढच् उAठऊ , व वेगवेगळया कंपनीचे 10 मोबईल आणि ढAढA छएदजछ कंपनीची चार चाकी वाहन असे एकुन अंदाजे किंमत 7,15,000 / – रु . असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पुढील तपास आर . एस . गायकवाड , पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस ठाणे , बीड हे करीत आहेत . सदरची कार्यवाही ही मा . पोलीस अधीक्षक साहेब , बीड , अप्पर पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रविंद्र गायकवाड , पोउपनि निशीगंधा खुळे , विजेंद्र नाचण , पोना अनिल डोंगरे , संतोष म्हेत्रे , शेख आसेफ , बप्पासाहेब दराडे , पोशि अविनाश गवळी , मपोशि सुनिता शिंदे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे बीड , पोना कांबळे , किरण पवार , बाळकृष्ण रहाडे सर्व नेमणुक पो.मु.बीड व वाहन चालक दुधाळ यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!