बीड

रस्त्याचे काम दर्जेदार करा – आ. संदिप क्षीरसागरांचे प्रशासनाला निर्देश, तेलगाव नाका ते नाळवंडी नाका मार्गे पिंपळनेर रस्त्याचे काम सुरू


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : शहरातील तेलगाव नाका, नाळवंडी नाका मार्गे पिंपळनेर रस्त्याचे कामाची सुरूवात आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, आसारामभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकली पाहिजे असे निर्देश यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

बीड शहरातील व ग्रामीण भागातील विकास कामे आ.संदिप क्षीरसागर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. शहरातील तेलगाव नाका ते पॉलिटेक्निक कॉलेजपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी या भागातील अनेक शिष्टमंडळांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केली होती. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेवरून संबंधित यंत्रणेने सदरील काम हाती घेतले आहे. शहरातील तेलगाव नाका, नाळवंडी नाका मार्गे शासकीय तंत्रनिकेतन या रस्ता कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.संदिप क्षीरसागर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकली पाहिजे. त्यात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई करा अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, आसारामभाऊ गायकवाड, जावेद कुरेशी, आरेफ खान पठाण, रशीद शेख, रईस शेख, मुजीब सय्यद, रफिक पटेल, कालु बेग, खलील अध्यक्ष, सद्दाम खान, रौफ शेख, सुशिल जाधव,सय्यद अलीम टेलर, सय्यद मोईस आदी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!