Uncategorized बीड

आता उमेद’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राहूल रेखावार, राज्य सरकारने तीन आयएएस अधिकार्‍यांच्या काढल्या ऑर्डर


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : राहूल रेखावार यांच्या बदलीनंतर बीड जिल्हाधिकारी पदी रविंद्र जगताप यांना नियुक्ती देण्यात आली, जगताप यांच्या नंतर आता राहूल रेखावार यांचीही ऑर्डर राज्य सरकारने काढली आहे. सरकारने त्यांना राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान (उमेद मुंबई) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती दिली आहे. या संदर्भात बुधवारी आदेश काढले आहेत. रेखावार यांच्याबरोबरच जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा यांची अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव एम.एम. सुर्यवंशी यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!