बीड

दक्ष यंत्रणेमुळे पोलिओचे लसीकरण शंभर टक्के झाले यशस्वी ! जिल्ह्यातील 217742 बालकांना दिला डोस, बीडमध्ये जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, सीईओ अजित कुंभार तर अंबाजोगाईत झेडपी अध्यक्ष शिवकन्या सिरसाट यांनीही बालकांना दिला डोस


बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र नाळवंडी येथे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.डॉ.सचिन देसाई , सहाय्यक संचालक, राज्य कुटुंब कल्याण भवन पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ.सुर्यकांत गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय संपर्क ) डॉ.बाबासाहेब ढाकणे , मा.सौ.केशरबाई घुमरे सदस्या , जि .प.बीड , गंगाधर घुमरे , तालुका अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष , मा.श्री . उत्तरेश्वर सोनवणे , सदस्य , पंचायत समिती बीड नाळवंडी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा तरकसे व डॉ. सोनाली सानप तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ .इनामदार श्रीमती स्मिता नलावडे , पी.एच.एन. , जि.प . बीड , जिल्हा लेखा व्यवस्थापक, श्री.संतोष चक्रे, श्री.शेषनारायण हाटवटे, श्रीमती कुर्लेकर, श्रीमती शाईवाले, तसेच अयुबखान, शेलकर, बी.सी.चव्हाण, श्री शिवाजी सोनवणे, श्री.आर.एस.बहीर डोंगरे गोरे, सतकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोलिआ डोस पाजण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यात प्रा.आ.केंद्र घाटनांदुर येथे राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा . ज्ञानोबा बप्पा जाधव ( सरपंच ग्रा.पं.घाटनांदुर ) हे होते. यावेळी मा.श्री शिवाजीभाऊ सिरसाट ( नेते , राष्ट्रवादी काँग्रेस ) , मा.श्री.बाळासाहेब देशमुख ( उपसरपंच ग्रा.पं.घाटनांदुर ) , मा.श्री.मच्छिंद्र वालेकर ( सदस्य , पं.स . अंबाजोगाई ) , मा.श्री मुक्तार भाई ( तंटामुक्ती अध्यक्ष , घाटनांदुर ) , मा.श्री.सुरेश जाधव ( माजी उपसरपंच , ग्रा.पं . घाटनांदुर ) , डॉ.बालासाहेब लोमटे ( तालुका आरोग्य अधिकारी अंबाजोगाई ) यांची उपस्थिती होती.तसेच श्री.संजय रानभरे ( पत्रकार ) , मा.श्री.संतोष प्रभु पुरी ( माजी सरपंच , ग्रा.पं.घाटनांदुर ) , श्री.नरसिंह सुर्यवंशी ( पत्रकार ) , डॉ . ज्ञानोबा मुंडे ( वैद्यकिय अधिकारी ) , डॉ.व्ही.बी.घोळवे , वैद्यकिय अधिकारी , डॉ.माधव जाधव ( वैद्यकिय अधिकारी , प्रा . आ.केंद्र घाटनांदुर ) , तसेच श्री.गोरे एस.के. ( आरोग्य सहायक ) , श्रीमती ए.आर शेख ( आरोग्य सहाय्यीका ) , श्री.पुजारी ए.एम. ( आरोग्य कर्मचारी ) , श्री.जाधव पी.व्ही.व आशा स्वंयसेविका उपस्थित होत्या . केज तालुक्यात प्रा.आ.केंद्र युसूफ बडगाव येथे मा.बजरंगबप्पा सोनवणे , उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती , जि.प.बीड , पंचायत समिती सदस्य , मा.उमाकांत भुसारी , सरपंच श्री.सचिनजी जावळे , ग्राम पंचायत सदस्य श्री.लामतुरे , रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री.चंद्रकांत थळकरी , शरद शिंदे , रुपेश बोरगावकर , पत्रकार सचिन उजगरे , तालुका आरोग्य अधिकारी , डॉ.विकास आठवले , वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार नेहरकर , डॉ.बिद्रोही ब्राम्हणे तसेच सर्व कर्मचारी व आशा , अंगणवाडी कार्यकर्ती यांची उपस्थिती होती. बीड जिल्हयाची एकूण लोकसंख्या 2684889 एवढी आहे, यापैकी 214088 एवढ्या बालकांना डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्याला 366000 पोलिओ डोस प्राप्त झाले होते. 2 कर्मचारी असलेल्या बुथची संख्या 11003 होती कर्मचारी असलेले बुथ 1257 एकूण बुथ 2357 5971 कर्मचारी एवढी होती. तर काल दिवसभरात जिल्ह्यात 217742
बालकांना (100 टक्के) पोलिओचा डोस देण्यात आला आहे. अति जोखमीच्या कार्यक्षेत्रात दिनांक 30 जानेवारी 2021 रोजीच सायंकाळी बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले आहेत. उर्वरीत वंचित बालकांना मंगळवारपासून पुन्हा गृह भेटी देऊन लस दिली जाणार आहे. शहरात 5 दिवस तर ग्रामीण भागात 3 दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे . तरी पालकांनी आपल्या पाल्यांना न चुकता पोलिओ लस दयावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!