बीड, 29 : – कोरोना वॅक्सिंन च्या लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्यात बीड जिल्हा आघाडीवर असून गुरुवारी दिवसभरात तब्बल १११ टक्के लसीकरणचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे .आरोग्य मंत्र्यांनी बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर. बी. पवार यांचे याबद्दल विशेष कौतुक केले आहे.
राज्यात गेल्या दहा पंधरा दिवसापासून कोरोना वॅक्सिंन चे लसीकरण सुरू करण्यात आले आहे .सर्वप्रथम आरोग्य आणि पोलीस तसेच महसूल आणि शिक्षक लोकांना ही लस देण्यात येणार आहे .बीड जिल्ह्यात दररोज नऊ केंद्रावर नऊशे अधिकारी कर्मचारी यांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे .यामध्ये शुक्रवार २८ जानेवारी पर्यंत तब्बल ४८५६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यापेक्षा बीड जिल्ह्यातील लसीकरणचा वेग हा जास्त असून याबद्दल राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी बीड च्या प्रशासनाचे कौतुक केले आहे.