बीड

शिवसेनेला धक्का; झुंजार धांडेंचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


बीड (प्रतिनिधी):- येथील शिवसेनेचे नेते झुंजार धांडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. झुंजार धांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अ‍ॅड.डि.बी. बागल यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
बीड येथील झुंजार धांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय होते. परंतू काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. परंतू शिवसेनेमधील निष्क्रीयता व बीड शहरात कामे करण्याची क्षमता आ.संदिप भैय्या क्षीरसागर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असल्याने झुंजार धांडे व त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवसेनेचे नेते झुंजार धांडे यांनी त्यांच्या असंख्य सहकार्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्यासाठी झुंजार धांडे यांना शुभेच्छा दिल्या. झुंजार धांडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला असून माजी मंत्रीव नगराध्यक्षांची देखिल झोप उडाली आहे.
2 Aींींरलहाशपींी

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!