बीड

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंकजाताईंनी सिंधूताईंचे केले अभिनंदन


दिल्ली, दि. 24 (लोकाशा न्यूज) : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या वर्षी एकूण 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. समाजकार्यात भरीव कामगिरी करणार्‍या सिंधुताई सपकाळ यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘‘अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधूताईंना पद्मश्री हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे राज्याच्या तात्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.
त्यांच्यासोबतच सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय, साहित्याबद्दल नामदेव कांबळे यांना, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे यांना, उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्यापार व उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासोबतच कला क्षेत्रात दिवंगत गायक एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो अबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!