बीड

आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झुंजार धांडे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड दि.25( प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्ते झुंजार धांडे आपल्या शेकडो समर्थकांसह मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी आ.संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
बीड शहरातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित तसेच विद्यार्थी प्रश्‍नावर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात पुढाकार घेणार्‍या झुंजार धांडे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. बीडचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी केवळ विकासाचे आश्‍वासन देऊन झुंजार धांडे यांची दिशाभूल केली होती. शहरातील प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 15 मधील विकास प्रश्‍न निकाली लागावेत अशी मागणी झुंजार धांडे यांनी केली होती. परंतु केवळ आश्‍वासनांचे शब्द मिळाले. सामाजिक विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे कार्य केवळ आमदार संदीप भैया क्षीरसागर हेच करू शकतात असे सांगत झुंजार धांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवार दि .26 जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन येथे आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार सुनील दादा धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे, माजी आमदार सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह झुंजार धांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. समाजातील विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण कायम कार्यरत राहू असे झुंजार धांडे यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!