महाराष्ट्र

सहका-याच्या जाण्याने पंकजाताई मुंडे झाल्या भावूक ,अभय चाटे यांच्या कुटूंबियांचे केले सांत्वन

परभणी । दिनांक २५ ।
कार्यकर्ता आणि नेत्याचे नाते हे जिव्हाळ्याचे तर असतेच पण त्याला भावनिकतेचीही किनार असते याचा प्रत्यय आज आला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले, त्यांच्या निधनाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना धक्का बसला, आज शहरात येताच त्यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले. त्यांच्या कुटुंबियांना धीर देताना त्या भावूक झाल्या होत्या.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खंदे समर्थक असलेले अभय चाटे हे परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. जिल्हयात अतिशय चांगले काम त्यांनी केले होते, याशिवाय पंकजाताई मुंडे यांच्या संघर्षयात्रेचे एक प्रमुख शिलेदारही होते. या तरूण उमद्या कार्यकर्त्याचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आज परभणीत येऊन त्यांच्या आई, पत्नी तसेच कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. पंकजाताई यांना पाहताच त्यांचे अश्रू अनावर झाले, यावेळी अभय चाटे यांच्या आठवणीने पंकजाताई देखील भावूक झाल्या होत्या. राजकारणातील एक सहकारी,धडाडीचा कार्यकर्ता गमावल्याचे दुःख त्यांना झाले.

सांगळे कुटुंबियांचेही सांत्वन

भाजपचे येथील नगरसेवक प्रशांत सांगळे यांचे बंधू चंद्रकांत सांगळे यांचेही नुकतेच निधन झाले. पंकजाताई मुंडे यांनी आज सांगळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. आ. मेघना बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, सुभाष कदम, माजी आमदार विजय गव्हाणे, रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!