बीड आष्टी

सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निघन

सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निघन

आष्टी, दि. 24 ( लोकाशा न्युज) गेल्या महिन्यात भारतीय लष्करात कर्तव्यावर असलेले जवान शरद चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर आपल्या लोणी या गावी आले होते.सोमवार दि.18 रोजी राञी 11.30 रोजी घराकडे येत असतांना मोटारसायकल झाडावर आदळून त्यांचा डोक्याला मार लागला.उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवार (दि.22) रोजी त्यांचा मृृृृत्यू झाला.त्यांच्यावर शनिवार (दि.23) सांयकाळी शासकीय इतमात शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,शरद दत्तोबा चांदगुडे हे सन 2004 मध्ये अहमदनगर येथे फौजमध्ये भरती झाले होते.त्यानंतर जम्मू,राजस्थान,
बेळगांव व आता पंजाब येथे आपले कर्तव्य निभावत होते.ते मागील महिन्यात 12 डिसेंबर रोजी आपल्या लोणी सय्यमीर या गावी एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते.सोमवार दि.18 जानेवारी रोजी राञी उशीरा घराकडे मोटारसायकलवर येत असतांना त्यांची मोटारसायक झाडावर धडकल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला.त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले माञ,
परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठीसाठी दाखल केले.माञ,उपचारा दरम्यान शुक्रवार दि.22 रोजी सांयकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.शनिवार दि.23 रोजी सांयकाळी लोणी सय्यदमीर येथे शासकीय इतमात जवान शरद चांदगुडे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.यावेळी आर्मी व पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते जयदत्त धस,अजय धोंडे,
तहसिलदार शारदा दळवी,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,आर्मीचे अधिकारी तसेच मिञपरिवार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरद चांदगुडे यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी,दोन मुले,दोन भाऊ असा परिवार असून,शरद चांदगुडे यांचे लहान बंधू बाळासाहेब चांदगुडेही फौजमध्ये कार्यरत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!