महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या युवक अध्यक्षपदी संदीप क्षीरसागरांची निवड

बीड; महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या युवक अध्यक्षपदी आ. संदीप क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या पुढील काळात समाजबांधवांना सोबत घेऊन राज्यभर समाजाचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. या पदावर माझी निवड केल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, खासदार रामदासजी तडस साहेब, महासचिव भूषणजी कर्डीले, कार्याध्यक्ष अशोकजी व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालालजी चौधरी, कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, सहसचिव बळवंतजी मोरघडे, सहसचिव संजीवजी शेलार, आबासाहेब बागुल यांच्यासह महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतील सर्व युवा बांधवांना माझी विनंती आहे की आपण मला साथ द्यावी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्व मिळून एकतेच्या सूत्राने काम करूया, असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!