महाराष्ट्र

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?, 30 डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहावे लागणार, आता खडसे लावणार का सीडी, संपूर्ण राज्याचे लक्ष

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस मिळाल्याची चर्चा असून त्यांना 30 डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना नोटीस मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांची एबीपी माझाला फोनवरुन दिली.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी सांगितलं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडी ची नोटीस मिळेल अशी खडसे यांना कल्पना होती. पण पण सध्यातरी अशी कुठली नोटीस नसल्याचं खडसे सांगत आहेत.

आता खडसे लावणार का सीडी,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच एकनाथ खडसे यांनी आपली ईडी चौकशी होण्याची शक्यचा वर्तवली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. यानुषंगानेच आता खडसे सीडी लावणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!