बीड

दुकानातील गल्ल्यावर कामगाराचा डल्ला,सव्वा तीन लाखांची रक्कम लंपास; सीसीटिव्ही फुटेजमधून चोरी उघड

बीड : बारदाना पोत्याच्या दुकानातील गल्ला उघडून आतील सव्वा तीन लाख रुपये लंपास केल्याच्या आरोपावरून कामगारावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी बीड शहरातील जुना मोंढा भागात उघडकीस आली.

मयूर जयनारायण काबरा यांचे जुना मोंढ्यात बारदाना पोत्याचे दुकान आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार दत्ता काशीद (रा. साक्षाळ पिंपरी, ह.मु. हनुमाननगर, पेठ बीड) हा कामगार मागील तीन-चार वर्षापासून त्यांच्याकडे त्यांच्या दुकानात बारदाना शिवणीच्या कामाला आहे. सायंकाळी ५ वाजता दत्ता दुकानात दिसून न आल्याने मुनीम बालाप्रसाद लोहिया यांनी त्याबाबत मयूर काबरा यांना कळविले. त्यावरून संशय आल्याने मयूर यांनी दुकानात येत गल्ला उघडून पाहिला असता त्यातील ३ लाख २५ हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यामुळे मयूर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दत्ता काशीद हा पैसे पिशवीत टाकून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. सदर फिर्यादीवरून दत्ता याच्यावर पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!