बीड

उद्या कलेकटर कचेरीवर धडकणार ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा, ओबीसी आता आरपारची लढाई लढणार : अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी घेतली आक्रमक भूमिका

माजी आ. पंकज भुजबळ, माजी खा. समीरभाऊ भुजबळ, बापूसाहेब भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांचे राहणार मोर्चात उपस्थितीबीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : आठरा पगड जाती- धर्मातील ओबीसींना घटनेने दिलेले आरक्षण धोक्यात आले असून ते टीकवण्यासाठी सर्व ओबीसी समाज एकीची वज्रमुठ बांधून आरपारची लढाई लढणार आहे. या अनुषंगाने बीड येथे मंगळवारी (दि.8 डीसेंबर) सिद्धिविनायक कॉमप्लेक्स,महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सकाळी 11वा. विराट ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरक्षण बचाव लढ्यात योगदान द्यावे अन्यथा आपलीच येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी केले आहे.माजी आ. पंकज भुजबळ, माजी खा. समीरभाऊ भुजबळ, बापूसाहेब भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी म्हटले आहे की, छोट्या- छोट्या जातींमध्ये विभागलेला आणि पारंपरिक व्यवसाय करून उपजिविका भागवणारा ओबीसी समाज आजही शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. एकीकडे ओबीसींचे मागासलेपण दुर करण्यासाठी कसलेही प्रयत्न होत नसताना दुसरीकडे घटनेने दिलेले आरक्षण हीरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ओबीसी समाजासह व्हिजेएनटी, एसबीसी जाती- जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी करणारी याचीका न्या. गायकवाड आयोगाच्या सर्व्हेक्षणाचे कंत्राट मिळवणार्‍या बाळासाहेब सराटे यांनी मंबुई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदरील याचिका न्यायालयाने स्विकारली असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत ओबीसींचे आरक्षण हीरावून घेण्याची बाजू मांडण्यात सराटे यशस्वी झाले तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. आरक्षण धोक्यात आल्याने ओबीसींचे अस्तीत्वच संपणार आहे. आरक्षण हिसकावून घेण्याचे डावपेच उधळून लावण्यासाठी ओबीसींना संघटीत होऊन एकीची वज्रमूठ बांधावी लागणार आहे. ओबीसींना ओबीसी नाहीत’ म्हणण्याचे धाडस करणारांना अस्तीत्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्व ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरून आरपारची लढाई लढावी लागणार आहे. या लढाईची सुरूवात 8 डिसेंबर रोजी बीड येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’ काढून होणार असून या मोर्चात ओबीसी विद्यार्थी, युवक- युवती, बेरोजगार, नोकरदार, राजकारणी यांच्यासह विविध संघटना व ओबीसीतील जाती- जमातींच्या बंधू- भगीनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अ‍ॅड. सुभाष राऊत व ओबीसी समाजातील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या 17 टक्के जागा दिल्या आहेत. यातील 12 टक्केच जागा भरल्या जातात. या परिस्थितीत प्रबळ, सत्ताधारी आणि राज्यकर्ते असलेल्या मराठा समाजाचा समावेश ओबीसीत केला तर मराठा समाजाचे आणि ओबीसींचेही नुकसान होणार आहे. यामुळे  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आणि स्वतंत्र आरक्षण द्यावे, मंडळ आयोगाची 100 टक्के अंमलबजावणी करावी, राज्यातील शासन, प्रशासन सेवा आणि शैक्षणिक संस्थांमधील ओबीसींच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची बंद पडलेली शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करावी, ओबीसींच्या महाज्योती संस्थेस 1 हजार कोटींचा निधी मंजूर करावा, ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्यांसाठी 8 डिसेंबर रोजी बीड येथे विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. सुभाष राऊत म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!