महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवत पोलीस उपनिरीक्षकाचा विवाहित महिला पोलीस शिपायावर बलात्कार

लातूर, 3 डिसेंबर :
लग्न करण्याचे प्रलोभन दाखवत पोलीस उपनिरीक्षकाने विवाहित महिला पोलीस शिपायावर बलात्कार केला आहे. तसेच कर्ज फेडण्यासाठी 5 लाख आणि घर बांधण्यासाठी 10 तोळे सोने घेऊन फसवणूक केली आहे. रहीम बशीर चौधरी ( वय 30, नेमणूक नांदेड कंट्रोल, रा. शिवनखेड, लातूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस शिपायाने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रहीम पुण्यात नियुक्तीला असताना त्याने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस शिपायाशी ओळख वाढविली. त्यांना लग्नाचे प्रलोभन दाखवले. त्यावेळी महिला शिपाई यांनी त्याला लग्न झाल्याचे सांगितले. मात्र, तरीही रहीमने तिच्याशी जवळीक वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यांच्याशी साखरपुडा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी 5 लाख रुपये घेतले. तसेच घर बांधण्यासाठी 10 तोळे घेतले आणि त्यानंतर लग्नास नकार दिला. महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ करीत हातपाय बांधून उचलून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!