बीड

आजपासून महिणाभर जिल्ह्यात चालणार ऑपरेशन मुस्कान मोहिमबीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, स्वाती भोर हे मोठी मेहनत घेत आहेत. एसपींच्या आदेशानेच जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान ही मोहिम आजपासून राबविण्यात येणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे  पोलीस महासंचालक म.रा.मुंबई यांच्याकडून ऑपरेशन मुस्कान 09  ही विशेष मोहीम दि. 1 डिसेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक श्री.आर.राजा, अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष पोलीस अधीकारी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, बीड श्री.एस.के. लाजेंवार यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, यांचे एक पथक ऑपरेशन मुस्कानचे काम करत आहे. बीड जिल्हयात 28 पोलीस स्टेशनमध्ये 28 पथके तयार करण्यात आले आहेत. त्या पथकामध्ये एक पुरूष व एक महिला पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकामार्फत त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाद्दीमध्ये बेवारस मुलांचा शोध घेवून त्यांचे नाव, गाव विचारुन त्यांची माहिती घेवून त्यांच्या आई- वडीलाकडे त्यांना सुर्पूद करण्यात येणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील जनतेस अवाहन करण्यात येते की, आपणास आई वडीलांपासून वंचित असलेले, हरवलेले 18 वर्षाखालील मुले- मुली आढळून आल्यास तसेच रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्नालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरवलेली मुले समजुन त्यांची चौकशी करुन त्यांचे कायदेशिर पालकाच्या तब्यात देण्यात येणार आहे. तरी सामन्य जनतेने यासाठी सहकार्य करण्यासाठी असे बालके आढळल्यास पोउपनि एस.एस.भारती  मोबाईल नंबरवर तात्काळ संपर्क करावा (मो.नं. 9552507031, पोहेकॉ / 789 पी.वाय.वाळके 9822079789) व जे मुले-मुली आपल्या आई-वडीलांपासून दूर गेलेले आहेत हरवलेले आहेत. त्यांना त्यांच्या आई- वडील यांचेशी भेट होवून त्यांना पुढील जीवन जगण्यास मदत होईल, यासाठी  ऑपरेशन मुस्कान – 9  विशेष शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!