महाराष्ट्र

पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तातडीने दखल, बिबटयांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत दिले होते पत्र

मुंबई दि. २६ —– राज्यातील बिबटयांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करावी या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेतली असून याबाबत वन विभागाला त्वरेने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या कांही महिन्यांपासून राज्यात मानवी वस्ती तसेच पाळीव प्राण्यांवर बिबटयांचे हल्ले वाढले आहेत. बिबटयांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. बिबटयांना रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केली होती. या पत्रात त्यांनी करावयाचे उपाय तसेच हल्ल्यातील मृत व जखमी व्यक्तींची त्यांच्या नांव, पत्त्यांसह माहिती दिली होती. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने लगेचच दखल घेत हे प्रकरण महसूल व वन विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले असून संबंधित खात्याला सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात करत असलेल्या कार्यवाहीची माहिती कार्यालयाने पंकजाताई मुंडे यांना मेल द्वारे कळविली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!