बीड, दि.9 -औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघातून भाजपने शिरिष बोराळकर यांना जाहीर केली, मात्र त्यानंतर या जागेसाठीचे प्रबळ दावेदार रमेश पोकळे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. आपण बुधवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे रमेश पोकळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहिर केले आहे. यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.
राज्य विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपने सोमवारी शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहिर केली. मात्र या जागेवर रमेश पोकळे यांचा दावा होता. रमेश पोकळे अनेक वर्षांपासून पदविधरांमध्ये सक्रिय आहेत. सिनेटच्या माध्यमातून देखील त्यांनी मोठयाप्रमाणावर संपर्क निर्माण केलेला आहे. भाजपचे निष्ठावंत असलेल्या रमेश पोकळेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बीडसह अनेक ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता आहे. शिरीष बोराळकर केवळ निवडणूकीपुरतेच पदवीधरांमध्ये असतात आणि इतरवेळी कार्यकर्त्यांचा ’कंडोम’ करतात असा पदविधरांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळेच या निवडणुकीत बंडखोरी करण्याचा निर्णय रमेश पोकळे यांनी जाहिर केला आहे. त्यांनी फेसबुकवरुन तशी घोषणा केली आहे. पोकळेंची बंडखोरी शिरीष बोराळकर आणि भाजपच्या अडचणी वाढविणार आहे. रमेश पोकळे हे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत.