Uncategorized बीड

पुन्हा आ. सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात होणार सामना, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार भाजपने केले जाहीर


बीड, दि. 9 : भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यानुसार औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पुन्हा एकदा शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे, त्याचबरोबर पुण्यातून संग्राम देशमुख, नागपूरमधून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदार संघातून नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचा उमेदवार अद्याप महाघाडीने जाहीर केला नसला तरी या मतदार संघातून आ. सतीश चव्हाण हेच उमेदवार असणार आहेत, त्यामुळे पुन्हा एखादा याठिकाणी आ. सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे; या निवडणुकीबरोबरच संघटना बांधणीसाठी आज सायंकाळी बीडमध्ये पंकजा ताई आणि चंद्रकांत पाटील बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!