महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने पतीला नपुंसक करण्याचा कट; असा झाला उघड

पुणे, दि.2 (लोकाशा न्युज) ः पतीला नपुंसक करण्याचा कट पत्नीने आखला होता. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचे मोबाइलवरील चॅट पाहिल्यानंतर हा कट उघडकीस आला. पुण्यातील वारजे माळवाडीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. प्रियकराच्या मदतीने पतीला नपुंसक बनवायचा कट ’ती’ने आखला. मात्र, याचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. वारजे माळवाडी येथे ही घटना घडली. दोघे आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
पतीच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा विवाह मार्च महिन्यात झाला आहे. पती सॉफ्टवेअर इंजिनीअर; तर पत्नी मेकॅनिकल इंजिनीअर आहे. लग्नापूर्वी पत्नीचे एकाशी प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचे नाही, असे ठरविले होते. मात्र, ते दोघेही एकाच कंपनीत कामाला असल्याने त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा जुळले. प्रियकर नेहमी आपल्या घराबाहेर फेर्‍या मारताना पतीला दिसत होता. पत्नीने महाबळेश्‍वरला जायचे नियोजन केल्यानुसार, दोघे तेथे गेले, तेव्हाही महाबळेश्वर येथे प्रियकर त्यांच्या अवती-भोवती फिरताना पतीला दिसत होता. यामुळे संशय आल्याने त्याने पत्नीच्या मोबाइलची पडताळणी केली, तेव्हा त्याला दोघांमधील चॅट आढळले. चॅटमध्ये पतीला नपुंसक बनवण्याच्या कटाची चर्चा आढळली. या कटाची ते महाबळेश्‍वर येथेच अंमलबजावणी करणार होते. मात्र, कटाचा सुगावा लागल्याने त्याने तेथून काढता पाय घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही आरोपींचे चॅटिंग सापडले आहे. तक्रारदाराला नपुंसक बनविल्यानंतर ते तिघे एकत्र राहणार होते. मात्र तक्रारदाराला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!