अंमळनेर ( लोकाशा न्युज ) अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत असणार्या सावरगाव येथे रविवारी दसरा मेळाव्याला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे उलंघन करुन मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे सहित आमदार ,खासदार ,मंत्री यांच्या सह चाळीस पन्नास लोकांवर पोलीस जमादार किसन सुखदेव सानप यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास डीवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करत आहेत .
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्या अंतर्गत असणार्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याला बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे ,डॉ.भागवत कराड खासदार ,मोनिका राजळे आमदार पाथर्डी ,मेघा बोर्डीकर आमदार जिंतूर ,महादेव जानकर मंत्री ,मा.आमदार भिमराव धोंडे, मा.जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, विजय गोल्हार , सुवर्णा लांबरुड प.स.सभापती पाटोदा ,संजय सानप, सावरगाव, रामचंद्र सानप सावरगाव सरपंच, राजाभाऊ मुंडे यांच्या सह 40 ते 50 जणांवर जिल्ह्याधिकार्यांच्या आदेशाचे उलंघन केले पोलीस किसन सुखदेव सानप यांच्या फिर्यादीवरुन अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करत आहेत.