महाराष्ट्र

अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, दि.19 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच, एक-दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं देखील सूत्रांच्या आधारे एबीपी माझाने वृत्त दिलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!