बीड

बीडमध्ये तरुणाची तर अंबाजोगाईत सालगड्याची आत्महत्या


बीड, अंबाजोगाई, दि.13 ऑक्टोबर : काम सोडल्यानंतर उचलीची रक्कम परत करूनही शेतमालकाने व्याजाच्या पाच हजार रुपयांसाठी सालगड्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत सतत त्रास दिला. नेहमीचा हा त्रास असह्य झाल्याने त्य सालगड्याने शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई लगतच्या चनई शिवारात रविवारी (दि.११) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी शेतमालकावर ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
लहू धर्माजी मोरे (वय ३८, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मयत सालगड्याचे नाव आहे. गतवर्षी लहू हा चनई येथील रवी नरहरी कदम याच्या शेतात सालगडी होता. परंतु तो सतत मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करत असल्याने लहुने त्याचे काम सोडले आणि टाकळगावला (जि. लातूर) येथे निघून गेला. रवीने त्या ठिकाणी जाऊन उचलीच्या २० हजारासाठी त्याच्याकडे तगादा लावत बळजबरीने लहुला घेऊन चनईला आला. त्यानंतर लहुने नवीन शेतमालक चंद्रकांत माणिकअप्पा उडगे यांच्याकडून २० हजार रुपये घेऊन रवीला दिले. मात्र, त्या रकमेवर पाच हजार रुपये व्याजाची रक्कम अधिक दे म्हणत रवीने पुन्हा त्याच्याकडे तगादा लावला होता. सहा महिन्यापूर्वी तो लहुला बळजबरीने घरातून घेऊन गेला आणि त्याच्याच शेतात काम करावे म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. त्याने लहूचा मोबाईल देखील काढून घेतला. रवीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर लहुने रविवारी रात्री शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लहूची पत्नी संगीता हिच्या फिर्यादीवरून रवी नरहरी कदम याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ॲट्राॅसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये करत आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी रवी कदमला तत्काळ अटक केली. त्याला न्यालायासमोर हजर केले असता त्यास १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच बीडमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीड शहरातील नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी एका तरुणाने गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.13) सकाळी घडली. आशोक बादाडे (वय 36 रा.) असे मयताचे नाव आहे. नवीन सरस्वती शाळेच्या शेजारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी सावकार्‍याच्या तगाद्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोह.सय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!