बीड, दि. 8 : बीड जिल्ह्यातील 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणार्या शालेय पोषण आहार कामगांराचे थकित मानधन होते. ते मानधन भेटावे म्हणून महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेने प्राथमिकच्या शिक्षणाधिकार्यांना लेखी निवेदन दिले होते, कामगारांचे मानधन तात्काळ वाटप करा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली होती, या निवेदनाची दखल घेऊन शालेय पोषण आहार कामगारांचे मानधन बीड जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीला वर्ग केले आहे. दोन दिवसात सर्व कांमगांराच्या खात्यावर मानधन जमा होणार असल्याचे शालेय पोषण आहार कांमगार संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे.
22 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशभरात कोविड-19 या महामारी आजारामुळे देशातील सर्व शाळा बंदचा निर्णय शासनाने घेतला, त्यामुळे शालेय पोषण आहार कामगारांचे काम बंद झाले. काम बंद झाल्यामुळे त्यांचे मानधन बंद झाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. याची तात्काळ महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार सिटु संघटनेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना लेखी निवेदन देऊन व ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्रातील सर्व शालेय पोषण आहार कांमगारानी कोविड19 या महामारीचे सोशल डिस्टींगचे सर्व नियम पाळून ठिकठिकाणी आंदोलने करून लेखी निवेदने दिली. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 2020 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदनांना लेखी आदेशाद्वारे कळविले की, शालेय पोषण आहार कामगारांना नियमित 10 महिन्याचे मानधन द्यावे, असे असतानाही बीड जिल्हा परिषदने याची अंमलबजावणी केली नाही, म्हनून जिल्ह्यातील सर्व कामगाराच्या मनामध्ये अंसतोष निर्माण झाला होता. महाराष्ट्र शालेय पोषण आहार कांमगार संघटनेने 28 सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले होते की, 12 ऑक्टोबर पर्यंत मानधन कामगारांच्या खात्यावर जमा नाही झाले तर बीड जिल्ह्यातील सर्व कामगार घेराव घालू असे कळविले होते. यांची दखल घेऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांनी 6 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हातील सर्व पंचायत समितिला मानधनाचा निधी वर्ग केला आहे, आणि दोन दिवसात तो निधी शालेय पोषण आहार कामगांराच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणून शालेय पोषण आहार कांमगांरामध्ये एकीचे बळ -आणि मिळते फळ’ या म्हणीप्रमाणे कामगारांमध्ये एक आंनद निर्माण झाला आहे. कॉ. प्रभाकर नागरगोजे, कॉ. डॉ. अशोक थोरात, मोहन ओव्हाळ, अशोक पोपळे, मिरा शिंदे, इंदताई फपाळ, अशोक कातखडे, विठ्ठल वैद्य, दशरथ गाढे, बाबासाहेब चादर, मधुकर गुंजाळ, शिवदास जगताप, अरूण कातखडे, अनिल ढोले, अप्पासाहेब ठोले, शेख अमजत, बालासाहेब तोर, तुकाराम इनामकर, विष्णु गुजर, वैजनाथ उंचे, अजिम बेग, लता शेजुळ, शादीक पठाण, भाग्यश्री सांळुके, मिरा दुनगु, शालन सुरवसे, रमेश पंचाळ, अशा नानवटे, मंगल गीत्ते, सोंळके , भागवत जाधव, रमेश चौरे , सिताराम थोरात , उतरेश्वर हुलगे , शुंभागी कचरे , दिपाली खाडे ,मिना जाधव , बाळासाहेब खाडे , भाग्यश्री गोरे , परीमळा गायके , कळेकर , वैशाली आडसुळ , रेखा डोंगरे , सुमित्रा डोईफोडे , शोभा सोळके , संजय घोगरे , बालासाहेब पवार , गंगा फडताडे , जयश्री सोळके , शंकर राहाटे , संपत गाडेकर , अशोक ढोले , नंदा सुपेकर ,गिंताजली पोकळे , सुरेखा वीर , चंद्रकला कुडके , छाया धोंडे , सायरा बी शेख , शकिला शेख , म्हतारदेव शेकडे , चंद्रकांत मुटकुळे , शेख चाँद , उतरेश्वर निंबाळकर , सुवर्णा घोडके , स्वाती काकडे , मनिषा ससाने इत्यादी सह अनेक संघटनेच्या पदाधिकार्यानी व कामगारांनी तात्कालिन शिक्षणाधिकारी जिल्हा परीषद बीड श्री बहीर , श्री मनोज लोंखडे , व विषेश म्हणजे सर्व पेपरचे पत्रकार , संपादक , वार्ताहार हे सर्वच या कांमगारासाठी मदत केली आहे .यांचे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामंगार संघटना सिटू च्या वतीने अभार मानले, असे प्रसिद्धी पत्रकात जिल्हा सचिव डॉ अशोक थोरात यांनी म्हटले आहे.
तालुकानिहाय एवढे मिळाले मानधन
जिल्ह्यातील शालेय पोषण आहार शिजवणार्या कामगारांना जुन, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिण्याचे 2 कोटी 46 लाख 4 हजार पाचशे रूपये मिळाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 2295000, आष्टी 2862000, बीड 3766500, गेवराई 2844000, परळी 2295000, माजलगाव 1899000, केज 2902500, पाटोदा 1989000, धारूर 1188000, शिरूर 1602000 आणि वडवणी तालुक्यात 967500 एवढी मानधानापोटी रक्कम मिळाली आहे.